कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल. Kirtan Pravachan is a very rich tradition in Maharashtra and the country. The kirtan tradition has contributed immensely to the enrichment of Indian cultural, religious and spiritual life. Over the last hundreds of years, thousands of kirtankars have worked to nurture the cultural, emotional and mental well-being of many generations. Kirtan is a great way to spread the message of God, country and religion, to educate the youth. Apart from entertainment, kirtan also introduces us to music, dance, literature, art, history, culture and traditions. Kirtan has an extraordinary power to turn human life around. Podcasts of various types of kirtans will be presented to inculcate love and awareness about kirtan, especially among the younger generation. In this Naradiya Kirtan, Rashtriya Kirtan, Warkari Kirtan, Tukdoji Maharaj Sampraday Kirtan, Ramdasi Sampraday Kirtan, Harikatha Kirtan, Dasganu Maharaj Sampraday Kirtan, Scientific Kirtan, other Sampraday Kirtan types will be presented.

Episodes

November 29, 2021 64 min

रामायणातील कौसल्या सुमित्रा कैकेयी मंथरा या सर्वांना माहीत आहेत. पण या सर्व मनोवृत्ती आपल्याही जीवनात आहेत. हा विषय - संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाच्या आधारे या कीर्तनात उलगडला आहे. सगुण निर्गुण भांडण, जगत् मिथ्या की सत् याचाही उहापोह येथे आहे.

Share
Mark as Played

जो साधक असेल त्याला भगवंताचा अनुभव येतो. जो मुक्त होतो तो भगवंताचा अनुभव घेतो आणि जो संत असतो तो भगवंताचा अनुभव देतो. अशा रितीने संत साहित्याची, संतौपदेशाची थोरवी या कीर्तनामध्ये वर्णन केली आहे. जीवनात कोणत्या सात अवस्थांना धन्य म्हणतात ? याविषयी मार्गदर्शन या निरुपणात आहे. कर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र व भक्तिशास्त्र याचेही विवेचन या निरुपणामध्ये आहे. 

 

Share
Mark as Played

धन्य काळ संतभेटी । पायी मिठी पडली तो ॥ प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनातील सर्वात धन्यता असणारा काळ कोणता ? जर जेव्हा संतांची भेट होते, तो काळ धन्य. कारण ती भेट आपल्याला अमूलाग्र बदलून टाकते. प्रपंचामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली तर इच्छा वाढतात पण परमार्थातील वस्तू मिळाली की इच्छा संपून जातात असे गोड चिंतन या कीर्तनात आहे. अधिक (महान कृष्णभक्त) श्री संत सूरदास यांच्या चरित्रातील एक दृष्टान्त मोठ्या भक्ती भावाने रंगविलेला आहे.

 

कीर...

Share
Mark as Played

मुलांवर चांगले संस्कार कसे करावे ? दत्त संप्रदायी कीर्तन - ह.भ.प. विवेकबुवा गोखले आपली मुले ही नुसती संतत्ती असू नये. ती सुसंतती असावी. सुसंस्कारीत असावी. त्या संस्कारावर पालकांनी अधिक लक्ष द्यावे, यावरील चिंतन या कीर्तनामध्ये आहे. या चिंतनाला जोड म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या कार्याचा आढावा घेऊन, आचार्यांच्या जन्माची कथा या कीर्तनामध्ये सांगितली आहे. 

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVish...

Share
Mark as Played

दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ विभूती म्हणजे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज. त्यांचा एक जो प्रसिद्ध अभंग "सदा संतांपाशी जावे" या अभंगावर दत्तसंप्रदायाचे अनुषंगाने निरुपण या कीर्तनात आहे आणि परमभक्त गोमाई हिला संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाने काय लाभ झाला याचे वर्णन केले आहे.

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाण...

Share
Mark as Played

नाथसांप्रदायी कीर्तनकार ह.भ.प. प्रभंजन भगत यांची मुलाखत - जाणून घ्या त्यांच्या कीर्तनसेवेचा प्रवास गप्पा हरिदासांशी : मुलाखती कीर्तनकारांच्या मुलाखतकार: ह.भ.प. चारुदत्त आफळे

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org

Share
Mark as Played

सहसा कुणी परमार्थाकडे वळत नाही, वळले तर साधना जमत नाही, जमली तरी देव प्रसन्न होतीलच याची खात्री नाही. आणि भगवंत प्रसन्न झाले तर काय मागावे ? देवाकडे काय मागावे ? हे भक्ताला कळेलच असे नाही अशा भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी संतांनी काही अभंगांची रचना केली आहे. त्या आधारे विवेचन पूर्वरंगात केले आहे. आख्यानामध्ये "विष्णुदत्त ब्राह्मणाची" कथा सांगितली आहे. दत्त माहात्म्य या ग्रंथाआधारे आलेली ही कथा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच...

Share
Mark as Played

अनेक संतांची चरित्रे, अनेक भक्तांची चरित्रे, सर्व जनांसाठी ज्यांनी पद्यरुपाने लिहून ठेवली असे सर्वमान्य महिपती महाराज. पण ज्यांना आधुनिक काळातील महिपती असे म्हटले जाते ते आहेत श्री संत दासगणू महाराज, ज्यांनी अनेक आधुनिक संतचरित्रे, वीरचरित्रे, ऋषीचरित्रे देखील गद्यपद्यात्मक स्वरुपात सर्व भक्तांना उपलब्ध केली. या अशा दासगणू महाराजांची आणि साईनाथांची भेटीची कथा या कीर्तनात आहे.

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube....

Share
Mark as Played

श्री नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग "आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥" असा आहे. या अभंगावरील निरुपणात संतांच्या कृपेचे मोठेपण वर्णिले आहे. संत परीक्षा कठोर घेतात पण उत्तीर्ण शिष्यावर कृपा देखील तेव्हढीच भव्य स्वरुपाची करतात. यावर चिंतन या कीर्तनामध्ये मांडले आहे. आख्यानामध्ये श्रीसाईनाथांनी काशीराम शिंप्यावर परीक्षा घेऊन अंती कृपा कशी केली हा प्रसंग मोठा रंगतदार पणे सादर केलेला आहे.

कीर्तनविश्व चॅन...

Share
Mark as Played

’ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धराया आले दीन जना’ या विश्वामध्ये संत का अवतीर्ण होतात आणि काय कार्य करतात याचे निरुपण या कीर्तनात केले आहे. देवाचे कार्य व संतांचे कार्य यातील भेद यावर चिंतन झाले आहे आणि संतकार्य कसे श्रेष्ठ आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे. कथाभागामध्ये श्री संत साईबाबा हे शिर्डीमध्ये कसे अवतरित झाले याचे गोड वर्णन आले आहे. 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa

कीर्तनविश्व प्रकल्...

Share
Mark as Played

प्रवासामध्ये आपण कोणत्या गाडीची संगत कातो त्याच्यावरुन आपण कधी पोचणार ते ठरते. तसेच भक्तिमार्गात सत संगती कसा लाभ देते याचे निरुपण या कीर्तनात आहे. श्री समर्थ रामदासस्वामी महाराजांनी चिलाजी पाटील यांवर कशी कृपा केली हे सांप्रदायिक आख्यान सांगितले आहे. चार दाणे दान करण्यासाठी कंजुषी करु नये अन्यथा संकट ओढवू शकते, हा उपदेश या कथेत आहे. तसेच कुणी काही चूक केली तर त्याला लगेच शिक्षा न करता त्याला क्षमा केल्याने एखादे वेळी त्या व्यक्तीच...

Share
Mark as Played

श्री संत समर्थ रामदास स्वामींच्या वर्णनासाठी नेहमी एक श्लोक म्हटला जातो. "शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे । " हा श्लोक कुणी रचला ? या श्लोकाचा अर्थ विस्तारपूर्वक या कीर्तनात सांगितला आहे. त्या बरोबरच समर्थ पंचायतनातील एक महंत श्री रंगनाथ स्वामींची आणि रामदास स्वामींची पंढरपूर क्षेत्री कशी भेट झाली याचे भावोत्कट चरित्र गायले आहे.

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/Kir...

Share
Mark as Played

प्रत्येक मनुष्याला हा अनुभव आहे की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी काही साधन करावे लागते. अकरावी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे साधन करावे लागते. व त्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. तसेच परमार्थ साधण्यासाठी सुद्धा साधन करावे लागते. कष्ट घ्यावे लागतात. मार्गदर्शन घ्यावे लागते. परमार्थासाठी कसे सायास करावे ? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ? त्यासंबंधी मार्गदर्शन या कीर्तनात केले आहे आणि समर्थ रामदासस्वामी या...

Share
Mark as Played

रंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शौर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक मानले जातात. संकटात फक्त हनुमानजींची आठवण येते. त्यांना संकटमोचन म्हणतात. हनुमानास सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. ते एक दास आणि राजदूत, रणनीतिकार, विद्वान, संरक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील होते. श्रीहनुमान जयंती निमित्त कीर्तनविश्व श्रीहनुमान जन्म कथा सादर करीत आहे. ही हनुमान कथा ऐका राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्...

Share
Mark as Played

ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांच्याबद्दल आणि त्यांच्या कीर्तनसेवेतील अनुभवांबद्दल जाणून घ्या. गप्पा हरिदासांशी : मुलाखती कीर्तनकारांच्या मुलाखतकार: ह.भ.प. चारुदत्त आफळे

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org 

Share
Mark as Played

श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा...

Share
Mark as Played

रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर श्रीरामभक्त चरित्र सप्ताह श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केल...

Share
Mark as Played

गणेश माहात्म्य भाग २ मोरयाची कृपा । Ganesh Chaturthi । ह.भ.प. महेशबुवा काणे "दे चरणांचा संग - मोरया दे चरणांचा संग ! जप तप साधन काही न घडले होतो मीही अपंग, मोरया " खरंच, पंगुता म्हणजे काय? तर सर्व इंद्रिये जागच्या जागी आहेत. पण काम करत नाहीत. ती अवस्था म्हणजे पंगुता. कान आहेत पण ऐकू येत नाही. डोळे आहेत पण नीटसे दिसत नाही. नाक हात पाय जसे हवे तसे कार्य करीत नाही त्याला पंगुता म्हणतात. परमार्थातही नियम तोच. कान असून कीर्तन ऐक...

Share
Mark as Played

गणेश माहात्म्य भाग १ दुर्वादेवी कथा । Ganesh Chatrurthi । ह.भ.प. महेश बुवा काणे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या सप्ताहातील तिन्ही कीर्तने आपण गणेश महात्म्यावर ऐकणार आहोत. भगवान श्री गणेशाचे परमभक्त - श्री. मुदगल ऋषी. या ऋषींनी गणेशाचे दर्शन-अनुभूती प्राप्त केली व मुदगल पुराणाची रचना केली. या पुराणात भगवान गणेशाच्या अवतारलीलांमधील अनेक दैवी लीलांचे वर्णन आले आहे. त्यातील काही कथांचा आपण या सप्ताहात आनंद घेणार आहोत हरिभक्त परायण श्र...

Share
Mark as Played

गणेश अवतार म्हणजे नक्की काय ? गणपती या देवतेचे माहात्म्य काय आहे ? आपण सर्वंनीच पार्वती माता, गणपती आणि महादेव यंची कथा ऐकली आहे. पण या कथेचे चिंतन केले आहे का ? या नारदीय कीर्तनामध्ये गणेश जन्म कथेबरोबरच आपल्याला या कथेचे आणि गणपतीच्या विविध अवतारांचे आत्तापर्यंत कधी न ऐकलेले निरुपण ऐकायला मिळणार आहे. 

 

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa

Thumbnail Credits: BalKrishna Art by Rames Harikrishnas...

Share
Mark as Played

Popular Podcasts

  If you can never get enough true crime... Congratulations, you’ve found your people.

  The Daily

  This is what the news should sound like. The biggest stories of our time, told by the best journalists in the world. Hosted by Michael Barbaro. Twenty minutes a day, five days a week, ready by 6 a.m.

  Dateline NBC

  Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations.

  Stuff You Should Know

  If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks then look no further. Josh and Chuck have you covered.

  The Ben Shapiro Show

  Tired of the lies? Tired of the spin? Are you ready to hear the hard-hitting truth in comprehensive, conservative, principled fashion? The Ben Shapiro Show brings you all the news you need to know in the most fast moving daily program in America. Ben brutally breaks down the culture and never gives an inch! Monday thru Friday.

Advertise With Us

For You

  Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

  Connect

  © 2021 iHeartMedia, Inc.

  • Help
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • AdChoicesAd Choices